दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ फेब्रुवारी):-दोन तरूणांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना केडगाव उपनगर व जेऊर बायजाबाई (ता.नगर) येथे घडल्या आहे.यासंदर्भात कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संभाजी प्रभाकर बोरूडे (वय 32 रा.शास्त्रीनगर, केडगाव) यांनी त्यांचे राहत्या घरात स्कार्पने गळफास लावुन घेतला ही घटना नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्याला त्याची आई गयाबाई प्रभाकर बोरूडे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.दरम्यान डॉक्टारांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जेऊर येथील तोडमलवाडी येथे राहणारा तरूण राकेश भाऊसाहेब तोडमल (वय 23) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.नगर-औरंगाबाद महामार्गावर तो हॉटेल व्यवसाय करत होता.त्याने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नाही.यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.