Maharashtra247

वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल

 

 

शेवगाव प्रतिनिधी (दि.१ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी दि.३१ जानेवारी रोजी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.यातील तक्रारदाराच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मोटार वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा यासाठी आरोपीने फिर्यादीकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती या कारणास्तव तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साधना इंगळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पोलिस अधीक्षक सौ.शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर,नारायण न्याहळदे,अपर पोलिस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक झोन,नरेंद्र पवार,वाचक, उपअधीक्षक कार्यालय, पोलिस अधीक्षक डॉ.पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथील पोलीस अधिकारी पोह/सचिन गोसावी,पोहवा/प्रफुल्ल माळी,पोहवा/चंद्रशेखर मोरे, पोहवा/मनोज पाटील,पोहवा/ विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला पकडले.याप्रकरणी उशिरा तक्रार दाखल करण्यात आली.

You cannot copy content of this page