मंगलपरिणय वधू-वर मंडळाच्या वतीने भव्य वधु-वर मेळावा;समाज बांधवांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा-बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे
अहमदनगर प्रतिनिधी (दि.1 फेब्रुवारी):-अहमदनगर येथील मंगलपरिणय वधु-वर मंडळ यांचे वतीने भव्य वधु-वर मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे.या मेळाव्यात अहमदनगर जिल्ह्यातील, तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील रहिवासी यांचे नातेवाईक नोकरी-निमित्त मोठे शहरात किंवा अहमदनगर जिल्हा सोडून इतर ठिकाणी स्थायीक झाले आहे.त्यांची नावनोंदणी वधु वर मंडळाकडून सुरु आहे.मंडळाने जुने सभासद यांचे नूतनीकरण व नविन सभासदांची नावनोंदणी करून भव्यदिव्य स्वरूपात मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे,तरी अधिका-अधिक समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क📳9891531188