देवळी तहसील कार्यालयात पसरले घाणीचे साम्राज्य कार्यालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-देवळी शहर तहसीलचे ठिकाण आहे आणि प्रशासनाने काही वर्षांपूर्वी देवळी तहसील कार्यालयाचे जुनी इमारत पाडून भव्य अशी मोठी इमारत निर्माण केली आहे.या तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात शहरी तसेच ग्रामीण जनतेची आपल्या कामासाठी येणे जाणे सुरू असते परंतु या भव्य तहसील कार्यालयाच्या अनेक भागांमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.या तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित अनेक प्रतिमा लावलेल्या आहे.तसेच यामध्ये अनेक महापुरुषांच्या प्रतिमा पण आहे परंतु या प्रतिमांवर जाळे आणि धुळाचे ढिगारे जमलेले आहे.तसेच तहसील कार्यालय मध्ये चोहीकडे उपयोगात न येणाऱ्या वस्तूंचा अनेक ठिकाणी ढिगारे लावूनं आहे, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीत व अस्वच्छतेचे वातावरण आहे तेथे येणारे जाणारे त्या दुर्गंधीमुळे पाणी पिऊ शकत नाही आणि तहसील कार्यालयाच्या प्रसाधन गृहामध्ये इतकी अस्वच्छता आहे की तेथे येणाऱ्या प्रसाधनाला नाक दाबूनच यावे लागते इतकी अस्वच्छता आहे तहसील कार्यालयाच्या अनेक भीतीवर पानाच्या पिचकाऱ्या उमटून आहे.आणि वर लटकलेले अस्तव्यस्त तार चोईकडे दिसून येते.भारत सरकार स्वच्छ भारत अभियानावर कोटी रुपये खर्च करीत आहे आणि तहसील कार्यालय स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार व प्रसार करीत आहे.परंतु ते स्वतःच्या कार्यालयात स्वच्छ भारत अभियान ही योजना राबायला विसरून गेल्याचे दिसत आहे आताच २६जानेवारी गणराज्य दिन सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा तहसील कार्यालयाची सफाई झालेली दिसत नाही याविषयी तहसीलदार राजेश सरोदे यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे सफाई कामगार नाही त्यामुळे आम्हाला सफाई करण्यास अडचण येत आहे परंतु आम्ही लवकरच तहसील कार्यालय स्वच्छ करू असे सांगितले. परंतु तहसील कार्यालयाच्या स्वच्छतेकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी तहसील कार्यालयात येणारे जाणारे नागरिक करीत आहे.