रस्त्यात साचलेल्या सांडपाण्याने नागरीक त्रस्त मानवी आरोग्यास धोका पोहचायची संभावना;देवळी नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेत रोष
देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-देवळी नगरपरिषदेच्या आवाराजवळ आणि जय हिंद व्यायाम शाळेपुढे जलशुद्धीकरण केंद्राचा बॅक वॉटर आणि बाजू असलेल्या नालीचा सांडपाणी भर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाट करून ना मोठ्या प्रमाणात कित्येक दिवसापासून अडचणींना तोंड देऊन मार्ग काढावा लागत आहे.सांडपाणी जमा असलेल्या ठिकाणापासून देवळी बसस्थानक आणि नगरपरिषद कॉलेज हे एकाच मार्गावर असल्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी तसेच वयोवृद्ध नागरिक यांना दुर्गंधी सांडपाण्यातून जावे लागत असल्यामुळे अत्यंत असंहनिय त्रास सहन करावा लागत आहे तसेच या सांडपाण्यामुळे शरीरास आरोग्यास नुकसान पोहोचत आहे.दुचाकी व ऑटो रिक्षा यांचा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील कित्येक दिवसापासून ही समस्या जाणवत आहे तरीही देवळी नगरपरिषद प्रशासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे जर इथे भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर याला देवळी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील का?असा प्रश्न देवळीतील त्रस्त जनता विचारत आहे.