अक्कलकोट (प्रतिनिधी):-भाजपा चिटणीस अक्कलकोट विधानसभा तथा राष्ट्रीय बंजारा सेना सोलापूर जिल्हाध्यक्षा सुरेखा राठोड व सहकाऱ्यांच्या वतीने आज रामनवमीनिमित्त ‘जय श्रीरामाच्या’ घोषणा देत मंदिरात पूजा करून नागरिकांना प्रसाद वाटप केला.सुरेखा राठोड यांनी सोलापूर जिल्ह्यात महिलांचे संघटन मोठे उभे केले आहे.
तसेच महापुरुषांच्या जयंती निम्मित नागरिकांना अन्नदान,शाळेतील मुलांना वहया,पुस्तके, दप्तर यांचे वाटप सौ.राठोड या सातत्याने करत असतात.

नेहमीच समाजाप्रती समाजसेवा करणाऱ्या नागरिकांच्या तसेच विशेषत महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुरेखा राठोड यांच्या वतीने आज श्रीराम मंदिरामध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते यावेळी गावकऱ्यांसोबत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.