अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर शहरातील महाजन गल्लीतील श्री.महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना आठ तासातच कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून पकडले असून त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 1 लाख 6 हजार 615 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सुरज उर्फ सोमनाथ राजू केदारे (रा.बोल्हेगाव), मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे (रा.वैष्णव नगर केडगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.यावेळी कोतवाली गुन्हे शोध पथकाचा शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी विशेष सत्कार केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाणे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,मपोहेकॉ. रोहिणी दरंदले,पोहेकॉ.विशाल दळवी, संदीप पितळे,सलीम शेख,दीपक रोहकले,तानाजी पवार,अभय कदम,सुरज कदम,सचिन लोळगे,अमोल गाडे,राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे, महेश पवार,सोमनाथ केकान, सोमनाथ राऊत,मपोकॉ.प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.