अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील 4 आरोपीना जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 40,000/-रूपये किंमतीच्या 5 मोटार सायकल हस्तगत केल्या आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्जत उपविभागामध्ये मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,रेकॉर्डवरील आरोपी नामे सचिन देविदास दाने हल्ली रा.नांदुर्खी रोड, शिर्डी, ता.राहाता,जि.अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह चोरीच्या मोटार सायकल विक्रीसाठी अहिल्यानगर येथून मिरजगाव, ता.कर्जत येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीवरून पथकाने ज्योतीबावाडी, ता.कर्जत येथे सापळा रचुन आरोपींचा शोध घेत असताना पाच इसम विना क्रमांकाचे दोन रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट, दोन स्प्लेंडर मोटार सायकल व एक बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकलवर येत असल्याने पथकाने त्यांना रस्त्याचे कडेला थांबविण्याचा इशारा केला असता एक इसम काळया रंगाचे बुलेट गाडी सोडून पळून गेला.पथकाने घटनाठि काणावरून सचिन देविदास दाने, वय 25, हल्ली रा.नांदुर्खी रोड, शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर मुळ रा.देवदरी, ता.येवला,जि.नाशिक, विधीसंघर्षित बालक वय 16, रा.नारळा,ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर,प्रसाद राजेंद्र रोटे,वय 19, रा.जानेफळ, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर,गणेश भागीनाथ जगदाळे,वय 28, रा.जाणेफळ,ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव सुरज गायकवाड पुर्ण नाव माहित नाही,रा.बीड असे असल्याचे सांगीतले.
पंचासमक्ष ताब्यातील आरोपींचे कब्जातुन 6,40,000/- रूपये किंमतिच्या गाड्या जप्त करून त्यात 2 बुलेट,2 हिरो होंडा स्प्लेंडर व 1 बजाज पल्सर अशा एकुण 5 मोटार सायकल हस्तगत केल्या असून हस्तगत करण्यात आलेल्या आहे.ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता आरोपी सचिन देविदास दाने याने विधीसंघर्षित बालक व सुरज गायकवाड अशांनी मिरजगाव,राहाता,पुणे, येवला व शिर्डी येथून मोटार सायकल चोरी करून त्या विक्रीसाठी प्रसाद राजेंद्र पोटे व गणेश भागीनाथ जगदाळे यांना दिल्याची माहिती सांगीतली आहे.आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून मिरजगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखावरून मिरजगाव पोलीस स्टेशन गुरनं 266/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.इतर ठिकाणचे मोटार सायकल चोरीबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे, सोमनाथ झांबरे,प्रमोद जाधव, भगवान थोरात,सुनिल मालणकर,भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ,अमोल कोतकर, प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे महादेव भांड यांनी केलेली आहे.