दौंड (प्रतिनिधी):-जनकल्याण शहर स्तर संघाच्या वतीने दौंड शहरात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती निमित्ताने निबंध स्पर्धा व वक्तृव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच या स्पर्धेत विजेता ठरलेल्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योतीताई मोकळ म्हणाल्या की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण,संविधान आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले.व शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हा जो मूलमंत्र दिला यात आजही ऊर्जा आहे.यावेळी महाराष्ट्र पॅंथर सेनेचे जयदीप बगाडे,विधिकार श्रीकांत थोरात,शांकी जैन,सिस्टर ऑलीव अलवेरा,कौसर सय्यद सचिव सुरय्या बेगम शेख खजिनदार तसेच सर्व सी आर पी यांचे सहकार्य लाभले व यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र पॅंथर सेनेचे जयदीप बगाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंंतीचे औचित्य साधून महिला बचत गटास संविधान प्रत भेट म्हणून दिल्या.