अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर मनमाड रोडवरून आय टेन शोरूम समोर एका स्विफ्ट कार मधून विनापरवाना बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास कारसह पकडून त्याच्या ताब्यातून 20 हजार 970 रू. किमतीची दारू तोफखाना पोलिसांनी हस्तगत केली आहे.ही कारवाई पोलिसांनी 16 एप्रिल रोजी केली असून आजिनाथ मुरलीधर आव्हाड (रा.पांगरमल तालुका जिल्हा अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ,ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल गिरी गोसावी करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पोलीस अंमलदार योगेश चव्हाण,सुधीर खाडे, भानुदास खेडकर,सुनील चव्हाण,सुनील शिरसाट,अहमद इनामदार,वसीम पठाण,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन,सतीश भवर,सागर साबळे,सुजय हिवाळे,महेश पाखरे,बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.