अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमी मिळाली की,उपनगरातील सोनानगर चौकातील मोकळ्या पटांगणात चारचाकी वाहनातून दोन्ही इसम गांजा विक्री करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून थांबले असता राखाडी कलरची चारचाकी गाडी आली व त्यात दोन इसम बसलेले असताना गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 1 लाख 27 हजार 500 रू.किमतीचा गांजा मिळून आला.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सचिन प्रताप कतारी (रा. संजय गांधीनगर संगमनेर), संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर (रा.संजय गांधीनगर संगमनेर) असे सांगितले. दोन्ही आरोपीं विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 416/2025 एनडीपीएस कलम 8 (क),20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी/ उज्वलसिंह राजपूत करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, नायब तहसीलदार गणेश भानवसे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पोलीस अंमलदार योगेश चव्हाण,सुधीर खाडे, भानुदास खेडकर,सुनील चव्हाण,सुनील शिरसाट,अहमद इनामदार,वसीम पठाण,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन,सतीश भवर,सागर साबळे,सुजय हिवाळे,महेश पाखरे,बाळासाहेब भापसे व मोबाईल सेलचे अंमलदार नितीन शिंदे यांनी केली आहे.