अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अंमलदार सुजय विल्यम हिवाळे यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करून ‘TOP COP OF THE MONTH’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री. अमोल भारती यांनी हिवाळे यांना प्रशंसा पत्र देऊन गौरव केला.

दिलेल्या प्रशंसांपत्रका म्हटले आहे की,अहिल्यानगर पोलीस दलास आपल्या या कामगिरी बाबत अभिमान आहे.भविष्यातही आपण असे परिश्रम घेऊन पोलीस दलाचे नाव उंचावण्यास मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
