अहिल्यानगर (दि.30 एप्रिल):- अहिल्यानगर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवरील ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या एकास नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी रात्री कोतवाली पोलिसांच्या मदतीने एका नामांकित हॉटेलवर छापा टाकून शुभम भगत (वय 32, रा. जे.जे.गल्ली,) याला अटक केली आली आहे.
भगतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यावर ऑनलाईन बेटिंग करताना २३ बनावट आयडी आणि १६ मोबाईल नंबरद्वारे सट्टा सुरू केला होता.या कारवाईत एकूण १६,००० रुपयांचा मुद्देमाल,मोबाईल फोन्स,आधारकार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.पोलीस अंमलदार सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5, 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.शहरात IPL मॅच बुकिंग रॅकेट अधिक मोठ्या प्रमाणात सक्रिय असून अनेक मोठे बुक्की अजूनही समोर येत नाहीत परंतु ते हि पोलिसांच्या रडारवर आहेत.