अहिल्यानगर (दि.३० एप्रिल):-रिल्स बनविण्याचे बहाण्याने बोलावुन मित्राकडुन ३१ लाख ७००००/-रुपये लुटणाऱ्या गुन्हयातील आरोपीस अटक करून चोरीस गेलेल्या रक्कमेतील १६ लाख ५०,०००/-रु.रोख रक्कम आरोपीकडुन हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीसांना मोठे यश आले आहे.घटनेतील फिर्यादी नामे श्रेयश पांडुरंग लटपटे (वय-२३ वर्ष धंदा-खा. नोकरी रा.भायगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,माझा मित्र नामे सुजित राजेंद्र चौधर (रा.निपाणी जळगाव,ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर) याने मला माझ्याकडे असलेल्या रोख रक्कमेची रील्स बनविण्याचे सांगुन माझा विश्वास संपादन करुन मला खोटे बोलुन मी त्याच्या कारमध्ये ठेवलेला ३१,६००००/-रु रोख रक्कम आणि १०,०००/-रु किंमतीचा लॅपटॉप असा एकूण ३१,७०,०००/- रुपयाचा मुददेमाल हा माझ्या परवानगी शिवाय अप्रामाणिकपणे घेवुन गेला वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ३२१/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३१६ (२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हयात आरोपीचा भाउ नामे अक्षय राजेंद्र चौधर याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याची शक्यता आहे त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर गुन्हयातील आरोपी नामे अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधर यास शिताफीने पकडुन त्याला विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हयात चोरलेली रकमेपैकी काहि रक्कम त्याचेकडे असल्याची माहिती दिली त्यावरुन त्याचेकडुन गुन्हयात चोरलेल्या रकमेपैकी १६,५०,०००/-रु.रक्कम जप्त करणयात आली आहे.सदर गुन्हयात आरोपी नामे अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधरी यास अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे सुजित राजेंद्र चौधर रा.निपाणी जळगाव,ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर हा फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहोत.सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई.विकास जाधव,पोकॉ/किशोर जाधव,पोकों/नवनाथ दहिफळे,पोकों.अक्षय रोहोकले, पोकॉ.राजेश राठोड,पोकों/भगवान वंजारी तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.