मुंबई प्रतिनिधी/प्रियंका गजरे (दि.१ फेब्रुवारी):-चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेली आहे यात म्हटले आहे की, दरवर्षी आपण संत रोहिदास यांच्या नावाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या तसेच समाजात काम करणाऱ्या कार्यकत्यांना पुरस्कार देत असतो व दरवर्षी याकरीता मनपा प्रशासनाकडून रू.१५ लाख रूपये या कार्यक्रमाकरीता निधी उपलब्ध होतो.दरवर्षी काही ठराविकच मोजके लोक संस्थेच्या नावाखाली यात पुढाकार घेतात.महापालिका खर्च करते व ही ५ ते ६ लोकांची टोळी हा पुरस्कार कार्यक्रमाचा विचका करून पैशांची बरबादी करते आणि वशिलाने मर्जीतील लोकांनाच पुरस्काराचे वाटप करते.त्यामुळे हा पुरस्कार बदनाम होत आहे.ही मंडळी पैशाचा अपहार करतात.त्यांनी आपली मक्तेदारी तयार करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नावाला संस्था स्थापन केली आहे. त्यात ते ठराविकच लोक आहेत.मुंबई शहरात चर्मकार चळवळीत काम करणाऱ्या जवळ जवळ १२ ते १५ संघटना आहेत.परंतु कोणालाही विश्वासात न घेता हे टोळकेच कार्यक्रम करीत असल्याने हा कार्यक्रम बदनाम होत असून सर्व संघटनांना विश्वासात घेवूनहा कार्यक्रम झाला तर तो लोकप्रिय होवून या कार्यक्रमांमागील उद्देश साध्य झाला असे होईल.तरी मुंबई महानगरपालिकेने या पुरस्कारासाठी कार्यक्रम समन्वय समिती मध्ये सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना सामावून घ्यावे.मुंबईमध्ये चर्मकार समाजाचे २५ लाख लोक राहतात परंतु कार्यक्रमाला १००० लोक देखील नसतात.हया लोकांना नियोजन जमत नाही.आपण मुंबई महानगरपालिकेचे लाखो रूपये खर्च करतो त्याचे चिज व्हावे असे वाटत असेल तर या मुठभर लोकांच्या हातून हा कार्यक्रम काढून घ्यावा व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा या समितीत समावेश करावा.थोडक्यात सर्व संघटनांना विश्वासात घ्यावे व अत्यंत शिस्तबध्द, सुत्रबध्द व नेमक्या नियोजनाने हा कार्यक्रम पार पाडावा.हे बदनाम टोळके पैशाचा सुध्दा अपहार करीत असून कधीही हिशोब नीट ठेवत नाहीत.हे जनतेचे पैसे आहेत याचे त्यांना भान नाही.सामाजिक चळवळीमधील ज्येष्ठांना तपासून हे पुरस्कार दिले गेले पाहिजेत योग्य माणसांना ते मिळावेत व वशीलेबाजी बंद व्हावी म्हणून आपण सदर संत रोहिदास महाराज समन्वय समिती, मुंबई बरखास्त करून सर्व संघटनांच्या लोकांना सामावून घेऊन आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनाना न्याय मिळेल अशा अनेकांना सोबत घेऊन नवीन कमिटी बनवून त्यांच्या सहकार्याने पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तयारी करावी म्हणजे सर्वांना न्याय मिळेल व महानगरपालिकेच्या पैशांचे चीज होईल व सर्वांचे समाधान ही होईल तरी याबाबत योग्य निर्णय करावा ही विनंती आहे.असे आयुक्तांना निवेदन दिले आहे.यावेळी चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री. सुभाष मराठे-निमगावकर, माजी नगरसेविका सौ.आशाताई मराठे,सहसचिव राजेश साबळे,सचिव राजनंदन चव्हाण,श्री.हंसराज रेगर अध्यक्ष रेगर समाज मुंबई,श्री.अशोक कांबळे अध्यक्ष गटई कामगार आघाडी मुंबई,राहुल कांबळे मुंबई युवा उपाध्यक्ष,श्री.मुकेश सिंग अध्यक्ष उत्तर भारतीय मुंबई,सौ.प्रियंका गजरे चर्मकार विकास संघ अध्यक्षा मुंबई प्रदेश (पत्रकार) व पदाधिकारी उपस्थित होते.
Your message has been sent

