राहता प्रतिनिधी (दि.१ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे यामध्ये महिलेचे कपडे फाडून तिला जबरी मारहाण करण्यात आली आहे याबाबत राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी व माझी आई तसेच आणखीन चार महिला एकूण सहा जण प्रशांत गायकवाड यांच्या शेतात कांदे लावण्याचे काम केले असता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्याने आम्हाला पैशाचे अडचण असून देखील तो पैसे देत नसल्याने प्रशांत गायकवाड यांच्या घरी जाऊन त्याच्याकडे कामाचे पैसे मागितले असता प्रशांत गायकवाड यांनी आम्हास म्हटले की तुम्ही भिलटे माझ्या घरी कसे काय आले आहेत असे म्हणून प्रशांत याने व त्याची पत्नी यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली व लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडकेने मारहाण करून प्रशांत गायकवाड याने पंजाबी ड्रेस फाडून छातीला धरले व तसेच पोटात लाथ्या मारल्या व म्हणाला की तुम्हा भिल्टांची एवढी हिम्मत झाली का तुम्ही माझ्या घरी येऊन पैसे मागता थांबा तुम्हाला सगळ्यांना भोंगळे करून तुमची धिंड काढतो असे म्हणून टॉप फाडून लज्या उत्पन्न होईल असे वर्तन केले व जवळच पडलेली कुराड उचलली व म्हणाला की तुमचे एकेकाचे मुद्दे पाडतो असे म्हटल्यावर आम्ही सर्वजण घाबरलो व तेथून त्याच्या तावडीतून जीव वाचून पळून आलो,असे माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहता पोलीस स्टेशन येथे गुरन ६१/२०२३, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम, भादविक ३५४ ब,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री.संजय सातव हे करीत आहे.
