वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-गेल्या अनेक वर्षापासून भजनी कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज सुधारक व्यसनमुक्ती हुंडाबळी अंधश्रद्धा या विषयावर त्यांच्या गायनातून प्रबोधन करत असतात गावोगावी दिंडी स्पर्धाचे आयोजन असलेल्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात येत असते भजनी मंडळ गावोगावी जाऊन त्यांची सेवा सादर करत असते देशाची संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रमामुळे टिकून ठेवणाऱ्या या कलावंतांना अजूनही पेन्शनचा लाभ मिळत नसल्याने सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेकडे भजनी मंडळांनी पेन्शन योजनेबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी धाव घेतली आहे संस्थेच्या अध्यक्ष दिपमाला मालेकर यांनी पेन्शन योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले,साई मंदिर रामनगर वर्धा,येथे भजनी मंडळाचा मेळावा घेण्यात आला,यावेळेस बामर्डा,वडनेर,किन्हाळा, नरखेड,काटोल,इत्यादी भजनी मंडळ उपस्थित होते.
