सेलू/वर्धा प्रतिनिधी(गजानन जिकार):-सेलू तालुक्यातील हमदापूर येथील श्री संत शामगीर महाराज देवस्थान मध्ये बुधवार दि.१ फेब्रुवारी २०२३ ला श्री संत भिकाराम फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली व फलकाचे अनावरण करण्यात आले.या प्रसंगी विविध कार्यक्रमात भजन,दिंडी सोहळा ग्राम प्रदक्षिणा श्री संत भिकाराम माहात्म्य आरती नंतर फाऊंडेशन चे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रसंगी श्री संत भिकाराम फाऊंडेशनच्या माध्यमातून जनकल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून या साठी आपल्या गावात रीतसर नोंदणी करून या सुवर्ण संधीचा नागरीकांनी आवश्य लाभ घ्यावा असे फाऊंडेशन चे छोटू यादव यांनी मार्गदर्शन केले.भाविकांनी श्री संत भिकाराम महाराज यांच्या विषयी सुखद अनुभव कथन केले.येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आरती व दुपारी गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी श्री संत भिकाराम महाराज की जय श्री च्या नामघोषाने हमदापूर नगरी दुमदुमली होती.या प्रसंगी सोहळात तेवीस दिंड्या सहभागी झाल्या होत्या.दिंडी प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते मानधन देण्यात आले.व उपस्थित मान्यवरांचा नारळ पान व भगवा टावेल सन्मानपूर्वक देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात या प्रसंगी श्री संत भिकाराम फाऊंडेशनचे तालुका प्रमुख भारत रोकडे,राष्ट्रीय सदस्य छोटू यादव,आकाश भेदरकर, भोला महाराज,सोना माता, शंकुमाता,सुरज वैद्य,मुकुंदा ताकसांडे,मंगेश कोकाटे, संघटक बबन जामुनकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पञकार गजानन जिकार,प्रमोद बुटे,विशाल गेडाम,दिपक कोल्हे,विठ्ठल सिरसागर,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते बंडू शंभरकर यांनी केले.यशस्वीतेसाठी सेवाग्राम येथील श्री संत भिकाराम बाबा फाऊंडेशन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. स्नेह अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
