अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्हयांत महागड्या मोटारसायकल चोरी करणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून यातील 2 आरोपीकडून 8 लाख 70,000 /- रू किंमतीच्या 8 मोटारसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्हयातील पोलीस स्टेशनला मोठया प्रमाणावर मोटार सायकल चोरीचे गुन्हे ना उघड असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नाउघड मोटारसायकल चोरी गुन्हयांचा समांतर तपास करून,गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पोलीस पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हयातील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करत असताना, पथकास गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम (रा.रांजणगाव रोड,ता.राहाता) याचेकडे चोरीच्या मोटार सायकल असून तो विक्रीसाठी राहाता ते पिंपळस रोड,राहाता येथे येणार आहेत.मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहाता ते पिंपळस रोड येथे सापळा रचुन संशयीतांचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम,वय 20, रा.रांजणगाव रोड,ता.राहाता, जि.अहिल्यानगर,सोनु सुधाकर पवार,वय 24, रा.साकुरी, ता.राहाता,जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम याने ताब्यातील मोटार सायकल या सोनु सुधाकर पवार व गणेश गोरखनाथ दरेकर,रा.पिंपळगाव जलाल,ता.येवला,जि.नाशिक याचेसह राहाता व श्रीरामपूर येथून चोरी केल्याची माहिती सांगीतली.
तसेच आरोपीतांकडे त्यांनी आणखी इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केलेबाबत विचारपूस केली असता नमूद 3 आरोपीतांनी अहिल्यानगर, नाशिक,पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणावरून मोटार सायकल चोरी केल्या असून,चोरी केलेल्या मोटारसायकल या खटकळी, देहेगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर येथील काटवनात लावलेल्या असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातील व देहेगाव येथील काटवनातील 8,70,000/- रूपये किंमतीच्या एकुण 08 मोटार सायकल जप्त केल्या आहे.ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह राहाता पोलीस स्टेशन गुरनं 228/2025 बीएनएस 305 (ब) या गुन्हयाचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन,गुन्हयाचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,गणेश लोंढे,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,अशोक लिपणे,रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार,भगवान थोरात,सुनिल मालणकर,अमृत आढाव,प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी केलेली आहे.