कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट येथील कारी मस्जीद शेजारी येथे एका टेम्पोमध्ये जनावरे कत्तलीसाठी बांधुन ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शोधपथकातील अंमलदार शहरातील झेंडीगेट येथील कारी मस्जीद शेजारी सापळा रचून थांबले असताना पथकास पांढ-या रंगाचा टेम्पो नंबर एमएच 14 एएस 6155 हा दिसला त्यावेळी छापा टाकुन टेम्पोमध्ये आत जावुन पाहणी केली असता त्यामध्ये 1) 45,000/- रुकिंती 1 गोवंशीय जातीची काळे रंगाची गाय, 2) 15,000/-रुकिंचे 3 गोवंशीय जातीचे काळे पांढरे रंगाचे वासरे 3) 4,30,000/- किचा. पांढ-या रंगाचा टेम्पो नंबर एमएच 14 एएस 6155 असा एकुन 4,90,000/- रु.किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे १) गुरनं 506/2025 बीएनएस २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम सन १९७६ चे कलम ५ (क), ९ (अ) तसेच प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतीबंध करणेबाबत अधी. 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आलेला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस अंमलदार बनकर हे करीत आहेत.
कोतवाली पोलीसांकडुन जनतेस अवाहन करण्यात येते की, आपणास गोमांस विक्री होत आहे अथवा वाहतूक होत आहे याबात माहीती मिळताच तात्काळ कोतवाली पोलीस ठाणेत कळविण्यात यावे..
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती,यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.प्रताप दराडे व मपोसई मुगडे,पोहेकॉ/बनकर,मपोहेकॉ/दरंदले,पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/ दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/ सचिन लोळगे,पोकॉ/पवार, यांच्या पथकाने केली आहे.