नगर (प्रतिनिधी):- तक्रारदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनी जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हापरिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग या नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहाची दुरुस्तीचे कामे अपूर्ण व न केलेल्या कामाचे बिल परस्पर संगनमताने काढणाऱ्या कनिष्ठ अभियंता,कनिष्ठ सहाय्यक,उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासन सेवेतून निलंबित व बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी पुराव्यासहित दि.22 मे 2025 रोजी निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन जिल्हापरिषदेने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती.व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार समितीने तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.जिल्हापरिषदेचे सा.बां.उपविभाग प्रभारी उपअभियंता यांच्या समोर केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने कामकाज झाले होते. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे सा.बां.उपविभाग प्रभारी उपअभियंता यांनी दि. 26/5/2025 रोजी आदेश काढले की,कनिष्ठ अभियंता डेरे यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात येत असून त्यांच्या कार्यभार हा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवावा असे त्यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.