अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गोमांस विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अवैध गोमांस विक्रीची माहिती काढत असताना पथकास कोठला झोपडपट्टी येथे एका शेडमध्ये अवैध गोमास विक्री चालू आहे अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी खात्री करून पथकाने छापा टाकला असता तेथील इसम तरबेज कुरेशी याच्या ताब्यातून 44 हजार रू.किमतीचे 220 किलो गोमास वजन काटा,सत्तूर असा एकूण 46 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार विलास लोणारे करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण,सुनील शिरसाठ,वसीम खान पठाण,योगेश चव्हाण, अहमद इनामदार,भानुदास खेडकर,सुधीर खाडे,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन,सुजय हिवाळे,महेश पाखरे,सागर साबळे,भागवत बांगर यांनी केली आहे.