अहिल्यानगर (दि.31 मे प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत झेंडिगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे कत्तल करून त्याचे माणस विक्री करण्याचा व्यवसाय पूर्वी चालू होता. याबाबत पोलीस प्रशासनाने वेळोवेळी गंभीर दखल घेऊन गोमास विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले होते.

अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांवर कायद्याचा धाक रहावा व त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करु नये यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये ओवेस रशीद शेख, 24 वर्ष,रा.आंबेडकर चौक, शाळा क्र.4. झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी प्रमुख),शोएब रौफ कुरेशी, यय २८ वर्षे, रा. कारी मस्जिद जवळ, बाबा बंगाली, अहिल्यानगर (टोळी सदस्य), फेसल अस्लम शेख, वय 19 वर्षे, रा. घर नं. 1846, हमालवाडा, आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी सदस्य), मुसाबीर युनुस कुरेशी, वय 22 वर्षे, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर (टोळी सदस्य) यांचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन टोळी हद्दपार प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक कार्यालयात मंजूर साठी पाठवला होता.या टोळीतील विक्रेत्यांन विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये वेळोवेळी 1499/2023 प्रमाणे भारतीय दंड संहिता 1860, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 या प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल होते.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर टोळी हद्दपार प्रस्ताव चौकशी करून हद्दपार टोळी प्रमुख व सदस्य यांनी संघटीतपणे महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करुन मांस हे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा रितीने कब्जात बाळगुण विक्री करुन,गोवंशीय जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रित्तीने दोरीने दाटावाटीने बांधुन त्यांची कत्तल करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहे. त्यांचेविरुध्द दाखल गुन्हे, करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई,जातीय दंगली घडविण्यासाठी लागणारी कारणे या बाबींचा व कायद्याला जुमानत नसलेल्या बाबींचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना त्यांचे विरुध्द दाखल गुन्ह्याचे अनुशंगाने बचावाचे मुद्दे सादर करण्याची संधी देण्यात आली परंतु त्यांनी मोघम स्वरुपाची माहीती दिल्याने त्यांचेकडे समर्पक कारण नसल्याचे दिसून आले.
त्यावरुन या टोळी विरुद्ध हद्दपारचे कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,पोलीस अंमलदार संदीप पितळे,रोहिणी दरंदले शिल्पा कांबळे दीपक रोहकले तानाजी पवार सुरज कदम सचिन लोळगे राम हंडाळ दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे महेश पवार सोमनाथ राऊत राहुल मासाळकर प्रतिभा नागरे दक्षिण विभाग मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.