सेलू/वर्धा प्रतिनिधी(गजानन जिकार):-सुप्रसिद्ध कवी शिक्षक श्री.ब्रह्मानंद शशिकला गणपत मुळे यांच्या ‘शिदोरी प्रेमाची’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २९ जानेवारी २०२३ ला बुटीबोरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.कार्यक्रम खैरे कुणबी समाज संघटना बुटीबोरी यांच्या विद्यमानाने बुटीबोरी येथील आई सभागृहात प्रसिद्ध कवी श्री.ब्रह्मानंद मुळे लिखित ‘शिदोरी प्रेमाची’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आपल्या विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक आचार्य श्री. ना.गो.थुटे सर व राजुरा विधानसभाचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.श्री.ब्रह्मानंद मुळे हे बहुजन समाजातील असून पेशाने शिक्षक आहेत.त्यांच्या ‘शिदोरी प्रेमाची’ या काव्यसंग्रहात एकूण 71 कविता आहेत.श्री.ब्रह्मानंद मुळे यांनी आपल्या कविता संग्रहाला ‘शिदोरी प्रेमाची’ हे नाव दिले आहे.ही शिदोरी त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रेमाची साक्ष आहे असे भावनिक उदगार ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो थुटे सर यांनी या प्रसंगी काढले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आणि ऊर्जा फाउंडेशन पुणेया संस्थेचे अध्यक्षा श्रीमती मेघाताई रामगुंडे, ग्रामगीताचार्य श्री.रुपेशदादा रेंघे,समाज प्रबोधनकार श्री.आकाश टाले व महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपसरचिटणीस श्री.सुभाष गणपत मुळे,सौ.वनिता सुभाष मुळे व कवीची पत्नी सौ. शितल ब्रम्हानंद मुळे व येथील श्री संत सखुबाई सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील खैरे कुणबी समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.
