अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ फेब्रुवारी):-ख्रिस्ती समाजातील विवाह इच्छुकांसाठी,मुला मुलींसाठी भव्य दिव्य असा ख्रिस्ती वधु वर परिचय मेळावा राहुरी येथे आयोजित केलेला आहे.हा मेळावा रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५ वा.पर्यंत आयोजित केलेला आहे.आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की कुठल्याही व्हाट्सअप नंबर वर मुला मुलींची आगाऊ माहिती पाठवू नये मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष समोरासमोर वधू-वर परिचय मेळावा होईल.फातिमा चर्च,नगर मनमाड रोड राहुरी फॅक्टरी अहमदनगर येथे या भव्य परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त मुला मुलींनी सहभाग घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क संयोजक श्रीधर भोसले (पुणे) मोनं📳७०८३९२२०५२
