अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पिस्तुलाने जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या गुन्ह्यातील आरोपीस तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्याची कामगिरी केली आहे. बातमीची हकीकत आशिकी,तोफखाना पो.स्टे. येथे दाखल असलेला गु.रजि.नं. 593/2025, भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(2), 352,189(2)(4), 191, (2) (3), 19 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 27 प्रमाणे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अकिव दाऊद शेख (रा.कवीजंग नगर फ्लॉट नं.37, गुलमोहर रोड,सावेडी,ता.जि अहिल्यानगर) हा गुन्हा दाखल झाले पासुन पसार होता व पोलीसांना वेळोवेळी हुलकावनी देत होता तो मिळून येत नव्हता. त्याचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार केले होते.
सदर आरोपी हा पोलीसांना दरवेळी हुलकावणी देत असे.परंतु दि.04 जून 2025 रोजी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अकिब दाऊद शेख हा मिरावली दर्गा परिसरात येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व पोलीस अंमलदार यांना तोंडी सुचना देवुन बातमीप्रमाणे आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले असता गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अकिब दाऊद शेख यास मिरावली दर्गा परिसरात वेष बदलुन सापळा लावुन नमुद गुन्ह्यातील आरोपीची खात्री होताच तो पळण्याच्या तयारीत असतानाच त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकिब दाऊद शेख असे सांगितले.त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 20,000/- रु किं.चा एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल त्याच्याकडुन जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.