नाशिक (आशा कर्डक/मोरे):-शेतीमाल व वाहनचोरी करणाऱ्या आरोपीना म्हसरुळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जेरबंद करत वाहनचोरीचे ५ गुन्हे उघडकीस केले आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक पोलीस उपआयुक्त परिमंडळ १,श्री. किरणकुमार चव्हाण सहा. पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, श्रीमती पद्मजा बड़े यांनी चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने मसरूळ पोलीस ठाण्यातील गुरनं १२९/२०२५ था. न्य.सं.कलम ३०५(A) प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयाचे तपास करीत असतांना दि.१० जून २०२५ रोजी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना दाखल गुन्हयात गुप्त बातमीदार मार्फतीने पो.हवा. राकेश शिंदे यांना माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा आरोपी नामे १)योगेश धोंडीराम गांगुळे रा.मडकेजांब,तालुका दिंडोरी जि.नाशिक याने त्याचे साथीदार नामे पष्पू उर्फ रविंद्र बाजू मोरे रा.इंदोरे ता.दिंडोरी जि.नाशिक याचेसह केला नमूद गुन्हा करण्यासाठी वापरलेली व चोरलेली पिकअप गाही क MH 11 т 3354 ही दिंडोरी रोड नाशिक शहरात येणार आहे.
अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महसरुळ पोलीस ठाणे, नाशिक शहर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सदर आरोपीतांस गुन्हा उकल होण्याच्या दृष्टीने ताब्यात घेण्याकरीता गुन्हे शोध पथकासह हनुमान मंदिराजवळ,दिंडोरी नाशिक येथे सापळा रचला असता वरील नमुद वाहन सदर ठिकाण येताच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हे गाडीसह पळाले त्यावेळी पथकाने आरोपीतांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.सदर आरोपी यास पुढील कार्यवाही करता म्हसरूळ पोलीस ठाणे येथे आणले असता त्याने त्याचा मित्र पप्पू उर्फ रविंद्र बाळू मोरे यांचेसह म्हसरूळ परिसरात सोयाबिन,गहु,तांदूळ चोरी करीत असल्याबाबत सांगितले तसेच सदर चोरी करीता आरोपी हा त्याचे साथीदारसह ग्रामिण हद्दीतुन पिकअप गाडी चोरी करून गाडीही सोयाबीन,गहु, तांदुळ चोरी करण्याकरीता वापरत असल्याचे त्याने सांगितले त्यानुसार म्हसरुळ व इतर पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ श्री.किरणकुमार चहाण, सहा. पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.अंकुश चिंतामण,पोनि.सुनिल पवार, गुन्हे शोध पथकाचे पोउनि.दिपक पठारे,पोहवा.बाळासाहेब मुर्तडक,देवराम चव्हाण,राकेश शिंदे,सतिष वसावे,पो.अ.पंकज चव्हाण,पंकज महाले,गुणवंत गायकवाड,प्रशांत देवरे,स्वप्निल गांगुर्डे,जीतू शिंदे,गिरीश भुसारे यांनी केली आहे.