अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ फेब्रुवारी):-एक लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल फिर्यादीस नगर तालुका पोलिसांनी आरोपीला अटक करून पूर्ण मुद्देमाल जप्त करून मूळ मालकास केला परत,घटनेतील सविस्तर माहिती अशी की नगर तालुका पोलिस ठाणे येथे गुरन १३०/२२ भादवीक ३६३ वगैरे प्रमाणे अपहरण करून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले बाबत गुन्हा दाखल होता, सदर गुन्ह्यातील आरोपी तुकाराम शिवाजी भापकर यास अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचार पुस केली असता त्याने रत्न सुंदर अर्बन को ऑप सोसायटी माजलगाव जि.बीड येथे दील्याबाबंत सांगितले,तेथून सदरचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त करून तसेच मा.न्यायालयाची परवानगी घेऊन फिर्यादी यांच्याकडे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,नगर तालुका सपोनी/राजेंद्र सानप यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे .
