मनिषा जाधव (वसई/विरार प्रतिनिधी):- जगामध्ये पितृदिन हा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो तसेच वडील आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ असतात,तसेच हे लावलेले झाड भविष्यासाठी सावली व संरक्षण देईल.असा संदेश समाजाला देत विरार ची गावदेवी आई जीवदानी माता मंदीराच्या पायथ्याशी,पाचपायरी येथे “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट” व जीवदानीदेवी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१५ जून २०२५ रोजी पितृदिनाचे औचित्य साधून १०० भारतीय रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
आई जीवदानी माता संस्थान चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडुलकर यांच्या हस्ते प्रथम रोप लावून वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आली. “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट ” द्वारे जीवदानी माता संस्थान व वनखात्याच्या परवानगीने गत वर्षी जूनमधे सुद्धा स्वातंत्रवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंती निम्मित १४१ रोपांची लागवड करण्यात आली होती. तसेच यापुढेही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट” व जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.