रामसेतू पुल पादचारी मार्ग बंद झाल्याने नागरिकांचा तीव्र संताप…ग्रामसेतू पूल बचाव कृती समितीच्या कल्पनाताई पांडे यांनी नाशिक मनपा स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
नाशिक प्रतिनिधी (आशा मोरे कर्डक नाशिक):-पुणे येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाला.अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील जुन्या पुलांचे ऑडिट करण्याच्या सूचना सरकारकडून दिले असता…नाशिक येथील रामसेतू पुल हा खड्डे आणि धोकेदायक झाला असून तो पादचारी मार्गासाठी बंद करण्यात आला आहे.
हा पुल बंद झाल्याने पंचवटीतून सराफ बाजारात जोडणाऱ्या या पुलामुळे शाळेतील विद्यार्थी व्यवसायिक पादचारी यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून स्मार्ट सिटी अंतर्गत हा पूल पाडून नवीन बांधणार की दुरुस्ती करणार अशा प्रकारच्या मनपाच्या वतीने काही सूचना न देता अचानक पूल बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे.
अचानकपणे पुलाला पत्रे लावून पादचारी मार्ग बंद केल्यामुळे ग्रामसेतू पूल बचाव कृती समितीच्या कल्पनाताई पांडे यांनी नाशिक मनपा स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना धारेवर धरत गेल्या चार वर्षात पुलाचे काम केले नसून हा पूल एका बाजूने चालू ठेवून दुसऱ्या बाजूने काम करून नागरिकांना त्रास न होता या पुलाचा वापर चालू ठेवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ.पांडे व येथील स्थानिक व्यावसायिक आणि पादचारी नागरिकांनी केली.
