विभागीय लेखा अधिकारी झाले ज्योतिषी..राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगर विभागीय लेखा शाखेच्या विभागाला अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याची हाक..25 वर्षाच्या सेवेचे नुकसान
(प्रतिनिधी):-राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगर विभागामध्ये विभागीय कार्यालयामध्ये पांडुरंग तांबे हे इमारत निरीक्षक पदी कार्यरत होते.2019 साली त्यांच्या वेतनातून पूर्वकल्पना न देता व कोणतीही चूक नसताना तसेच लेखी न कळवता पुढील पाच वर्षांची म्हणजे 2023 पर्यंत ची कपात एकाच वर्षी (२०१९ मध्येच) करण्यात आली.या प्रकारामुळे तांबे यांना आर्थिक व मानसिकदृष्ट्या गंभीर फटका बसला.त्यांनी वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात विभागीय लेखा अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता, 2019 वर्षी कापलेली रक्कम ही सन 2020,2021,2022,2023 या वर्षीची आहे असे सागून, त्यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली, कोणतीही स्पष्टता दिली नाही.
लेखा अधिकारी हे ज्योतिषी असल्याने भविष्यात काय होणार हे विभागीय अधिकारी यांना अगोदर समजले असेल.मुळात कोणतेही वसुली नसताना मोठ्या प्रमाणावर कपात केली. संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार केला असून देखील, झालेल्या चुकीवर कोणतीही चौकशी अथवा दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आलेली नाही. ही चूक लपवण्यासाठी विभाग नियंत्रक प्रयत्न करण्यात आले.शेवटी विभागीय लेखा अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून , झालेल्या कपाती मुळे पुढील पेन्शन, पीएफ, ग्रॅज्युटी व इतर मिळणाऱ्या रकमेला देखील कपात केली जाऊ शकते , विभागीय लेखा अधिकारी यांच्या दहशतीला घाबरून, मनमानी कारभाराला घाबरून, व वेतनातून चुकीची कपात या सारख्या अन्यायाने हताश होऊन,तांबे यांना शेवटी सेवांचा राजीनामा द्यावा लागला. विभागीय लेखाधिकारी यांच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांची 25 वर्षाच्या सेवेचे नुकस्कान झाले आहे.
त्यामुळे उपासमारीची वेळ केवळ विभागीयलेखा अधिकारी व त्याचे चुकीच्या कार्य पद्धतीमुळे आली आहे.हा केवळ तांबे अन्याय नाही, तर एक कर्मचारी म्हणून संपूर्ण व्यवस्थेवरचा प्रश्न आहे.या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कार्यवाही करावी आणि कर्मचारी यांची झालेली नुकसान भरपाई संबंधित विभागीय लेख अधिकारी यांच्याकडून करून संबंधित कर्मचाऱ्यांना मिळावी व इतर कर्मचारी याच प्रकारचा अन्याय सहन करायला भाग पाडले जाणार नाही, याची हमी द्यावी. यावर कोणती कारवाई न झाल्याने लवकरात उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे.असे अन्यायग्रस्त माजी कर्मचारी तांबे पांडुरंग यांनी यावेळी सागितले आहे.
