जुने नायगाव शाळेत योग दिन उत्साहात संपन्न..सरपंच डॉ.राशिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील नायगाव जुने जुने नायगाव शाळेत योग दिन उत्साहात संपन्न..सरपंच डॉ.राशिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप व शाळेत ११ वा जागतिक योगदिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून योगासने व प्राणायाम करून घेतले.विद्यार्थ्यांनी चक्रासन, उष्ट्रासन,ताडासन,वृक्षासन,शीर्षासन आदी योगासने उत्कृष्ट करून दाखवली.निरोगी जीवनासाठी योगासने,प्राणायाम,योग्य आहार,चांगले विचार गरजेचे असल्याचे सरपंच राशिनकर यांनी नमूद केले.सरपंच डॉ.राजाराम राशिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.
यावेळी कार्यक्रमास नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ भिकचंद लांडे,चंद्रसेन लांडे,सुनिल दातीर आदी उपस्थित होते.शेवटी शिक्षिका सुजाता सोळसे यांनी आभार मानले.