देशी विदेशी दारु विकणा-यावर तोफखाना पोलीसांची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-देशी विदेशी दारु विकणा-यावर छापा टाकुन तोफखाना पोलिसांनी एक जण ताब्यात,घेत एकुण १०,६८५/- रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
दि.२१ जून २०२५ रोजी तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि.श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमी मिळाली की, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत नेप्ती नाका येथे एका टपरीचे आडोश्याला विनापरवाना बेकायदा देशी विदेशी दारुची विक्री होत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन सदर बातमीच्या अनुशंगाने तोफखाना पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद बातमीतील ठीकाणी छापा टाकुन इसम नामे नरेश विठ्ठल पगडीमल याचे ताब्यातुन देशी बॉबी संत्रा व विदेशी कंपनीच्या इंम्परियल ब्लु,मॅगडॉल नंबर ०१, मॅगडॉल रम,असा एकुण १०६८५/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन त्याकडे चौकशी करता सदरची दारु ही अशोक घोडके यांची असल्याचे सांगीतल्यावरुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु र नं ६५७/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.श्री.आंनद कोकरे,पोउपनिरी.शैलेश पाटील, पोउपनिरी.दळवी व तपास पथकाचे अंमलदारांनी केली आहे.