स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व-वृषाली सरोदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग अभ्यासक वृषाली सरोदे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आजच्या धकाधकीच्या काळात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.योग ही प्राचीन भारतीय मन-शरीर विश्रांती चिकित्सा आहे. योग हा एक अत्यंत आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक सराव आहे. ओंकार ध्वनी हा जगातील सर्व मंत्रांचा केंद्रबिंदू मानला जातो. ओम शब्द उच्चारल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा वाहते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी ओम जप उपयुक्त आहे.
ओंकार आणि सूर्यनस्कार यांच्या एकत्र साधनेमुळे आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक विकास होतो, असे यावेळी सांगण्यात आले.वृषाली सरोदे यांनी सूर्यनमस्कार कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत मुलांकडून व उपस्थित कर्मचार्यांकडून ते करून घेतले.प्रास्ताविक चंद्रकांत शेंबडे यांनी केले, तर आभार सुभाष राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजाता मासुळे, प्रवीण राठोड, कौशल्या शेंबडे,कृष्णा बोरावके, रवींद्र पवार, जयंती पाटील, सुनिता पाटील, लंका वाघ , प्रकल्प संचालक समाधान धालगुडे यांनी परिश्रम घेतले.