सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई लोखंडे यांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर…
प्रतिनिधी:-परतूर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा सत्यशोधक लहुजी क्रांती संघाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती नंदाताई संजय लोखंडे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण नांदेड येथे दि.२६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने होणार आहे.
नंदाताई लोखंडे यांनी समाजात शाहू,फुले,आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीत योगदान दिले आहे.त्यांनी प्रामुख्याने बहुजन समाजावर तसेच महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा दिला आहे.
दि.२६ जून रोजी अण्णाभाऊ साठे पीपल फ़ोर्स चे संस्थापक अध्यक्ष बा.रा.वाघमारे यांच्या उपस्थितीत रुबी हॉल नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.