बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील जामिनावर सुटलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक..कोतवाली पोलिसांनी केला गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे याने त्याचा जामिन झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा कारागृह वर्ग २ मधुन बाहेर आल्यानंतर कारागृहाचे बाहेरच फटाके फोडुन, बेकायदेशीर जमाव जमवुन,चारचाकी वाहने व दुचाकी वाहने यांचेसह शहरातुन रॅली काढून समाजातील लोकांवर दहशत निर्माण करण्याचे उददेशाने शहरातुन मिरवणुक काढत असलेला ऑडीओ व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.
सदरचा व्हिडीओ जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पाहिल्यानंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेवून तात्काळ आरोपी व त्यांचे साथीदार यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कोतवाली पोलीसांना दिले.सदर व्हायरल व्हीडीओची पडताळणी केली असता त्यामध्ये दि.२० जून २०२५ रोजी येथील रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे रा. केडगाव याने त्यांचा न्यायालयाकडुन जामिन मिळाल्यानंतर कारागृहासमोरुनच दुचाकी व चारचाकी वाहन ताफा व सोबत ७० ते ८० इसम यांचे सह सार्वजनिक रस्त्यावरुन आरडाओरडा करत,मोठयाने घोषणाबाजी करत फटाके वाजवत बेदरकारपणे वाहने चालवुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला व समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचे उददेशाने कारागृह ते केडगाव वेस पर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांसह मिरवणूक काढून जामिन झाल्याचा आंनद जल्लोषात साजरा केला होता, सदरचे घटनेवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५८४/२०२५ भा.ना.स. कलम १८९,१९०,२२३,२८१,२८५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७. (१). (३) अन्वये पोकॉ.४९८ अनुप झाडबुके यांचे फिर्यादीवरुन आरोपी नामे सागर उत्तम भिंगारदिवे व त्याचे इतर ७० ते ८० अनोळखी साथीदार यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हयाचे वेळी हजर असणारे आरोपीचे साथीदार यांचा सीसीटीव्ही फुटेजव्दारे शोध घेवून गुन्हयात वापरण्यात आलेली सर्व वाहने शोध घेवुन जप्त करण्यात येणार असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णकुमार सेंदवाड कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
अशा प्रकारे यापुढे कोणत्याही आरोपीने समाजात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्हयात मिरवणुक,रॅली काढल्यास त्याचेवर व त्याचे साथीदार यांचेवर कारवाई करुन त्याने व त्याचे साथीदार यांनी गुन्हयात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात येथील तसेच रोडवर विनाकारण स्टंट वाजी, विनापरवाना मिरवणुक, रॅली तसेच रोडवर वाढदिवस साजरे करणारे लोकांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी कळविले आहे.