अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ फेब्रुवारी):-तोफखाना गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी,लगातार दुस-या आठवड्यात पुन्हा एका इसमास गावठी कट्टासह केले जेरबंद,घटनेतील हकीगत अशी की,दिनांक 05/02/2023 रोजी दुपारी 12/45 वा.ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम हा फोनवर बोलत होता की, माझ्याकडे गावठी कट्टा आहे. मला त्याच्या गोळ्या मिळतील का?त्यावरुन गोपनिय बातमीदाराने माहिती दिली की,कल्याणरोड वरील जाधव पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या शनिराज मार्बल्स दुकानासमोर एक इसम हा गावठी कट्टा विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी लागलीच दोन पंचाना बोलावुन सदर ठिकाणी सापळा लावुन बसले असता तेथे एक इसम हा त्याच्याकडील बजाज कंपनीच्या डिस्कव्हर मोटर सायकलवर येवून संशईतरित्या हालचाली करताना दिसला असता त्यास 13/25 वा जागीच पकडुन विचारपुस करुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देविदास भिवाजी ढगे वय 36 वर्षे रा.धंदा शेती रा.केतकी ता.जि.अहमदनगर)असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्यामध्ये खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला तो,
1) 30,000/- रु किं. चा एक देशी बनावटीचा स्टिलचा पिस्टल,त्यास मॅगझीन असलेला त्याचे बटवर दोन्ही बाजुने विटकरी रंगाच्या फायबर पट्या त्यास स्कुने घट्ट बसविलेले.
2) 60,000/- रु किं. ची एक बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटर सायकल तिचा रजि नं एम एच 16 बी ए 0429 असा असलेली जु.वा. कि.अं.
3) 00-00/ रु किं. ची एक लाल रंगाची न्यु त्रिमुर्ती कलेक्शन नावाची पिशवी जु.वा.कि.अं.
90,000/- येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल हा दोन पंचासमक्ष जप्त करुन आरोपी व जप्त मुद्देमाल ताब्यात घेवून त्याचेवर पोस्टे गुन्हा रजिस्टर दाखल केला.सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील पो.उप निरी.समाधान सोळंके, पोहेकॉ/डी.बी.जपे,पो.ना. संदिप धामणे,पोकॉ.सतिष त्रिभुवन,पोकॉ.शिरीष तरटे, पोकॉ.दत्तात्रय कोतकर,पोकॉ.गौतम सातपुते यांनी व त्यांचे तपास पथकाने केली आहे.
