वर्धा प्रतिनिधी (दि.४ फेब्रुवारी):-विदर्भ शाहीर कलाकार परिषद शाखा कन्हानच्या वतीने नरखेड तालुका नवीन कार्यकारिणी ०३ फेब्रुवारी रोजी स्थापन करण्यात आली.यावेळी नरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.पुरुषोत्तमजी डांगोरे, उपाध्यक्ष श्री.रूपरावजी अरसडे,सचिव श्री. सुधाकरजी मुळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.या वेळी केंद्रीय अध्यक्ष श्री.मनीषजी भिवगडे,कार्याध्यक्ष अलंकारजी टेभुर्णे , सरचिटणीस अरुणजी वाहने,नागपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष दयालजी कांबळे व सर्व-धर्म समभाव संस्थेच्या अध्यक्षा दीपमालाताई मालेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी दीपमालाताई मालेकर म्हणाल्या की शाहीर कलावंत यांच्या पाठीशी सर्व-धर्म समभाव संस्थेची संपूर्ण कार्यकारणी उभी राहील या नूतन कार्यकारणीच्या निवडीच्या वेळी त्यांनी ग्वाही दिली.त्याचप्रमाणे नरखेड व काटोल तालुक्यातील सर्व कलावंत या नूतन कार्यकारणीच्या निवडीच्या वेळी हजर होते.
