Maharashtra247

बापरे.. ब्रँडेड कंपनीचे लाखोंचे मोबाईल जप्त,मोबाईल चोरी करणारी टोळी कोतवाली पोलीसांनीं केली जेरबंद…

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ फेब्रुवारी):-दि.०५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी नामे मच्छिद्र रामभाऊ आडकित्ते(रा. भुतकरवाडी, बालीकाश्रमरोड,अहमदनगर) यांच्या पत्नीस पुणे बसस्थानक अहमदनगर येथे एसटी बसमध्ये बसवून देत असतांना त्यांचे शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला त्यांचा ३०,०००/-रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे.वगैरे मा च्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ११४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक श्री.संपतराव शिंदे यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मोबाईल फोनची चोरी हि परराज्यातील आरोपींच्या टोळीने केलेली असुन सदरचे आरोपींनी वैभवी लॉज पंचपीरचावडी येथे भाडोत्री लॉजची खोली घेवून थांबलेले आहेत.अशी माहीती मिळाल्याने गुन्हेशोध पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी खोली क्रमांक २०२ मध्ये साहेबगंज राज्य-झारखंड येथील काही इसमांनी खोली बुकींग केल्याचे निदर्शनास आल्याने सदर ठिकाणी सापळा लावुन सदरच्या खोलीमधील इसमांची व खोलीची पंचांचे समक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी १) दिलबर नसरुददीन शेख वय-२१ वर्षे २) जॉनी मकवा शेख वय-२१ वर्षे ३) शोएब उंबर शेख वय-२२ वर्षे सर्व रा.मेहराजपुर मोतीझरणा, डाबंगा साहेबगंज राज्य-झारखंड हे मिळुन आले व त्यांचे कब्जात १)१५,०००/रु किंचा एक निळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन २)१५,०००/-रु किंचा एक रेड मी काळया रंगाचा मोबाईल फोन ३)१५,०००/-रु किंचा एक विवो कंपनीचा मोबाईल फोन ४) १५,०००/-रु किंचा एक रेड मी नेव्ही ब्ल्यु रंगाचा मोबाईल फोन ५)१५,०००/-रुकिचा एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन ६)१५,०००/रु किंचा एक रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जांभळया रंगाचा ७)५००/-रु किंचा हिरो कंपनीचा निळया रंगाचा साधा बटनाचा मोबाईल फोन ८)३०,०००/- रुपये किंमतीचा वनप्लस मोबाईल फोन काळया रंगाचा असे एकुन ८ मोबाईल फोन असा एकुन १,२०,५००/-रु किंमतीचा चोरीचा मुददेमाल मिळुन आला आहे.सदर मोबाईल बाबत चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे आम्ही अहमदनगर शहरातुन पुणे बसस्थानक येथुन चोरल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हा पोना/८३१आनंद दाणी हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,गुन्हे शोध पथकाचे पोसई/मनोज कचरे,पोहेकाँ/गणेश धोत्रे, पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/ए.पी.इनामदार,पोना/योगेश खामकर,मपोना/ कविता गडाख,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/सोमनाथ राउत,पोकों/संदीप थोरात,पोकाँ/अमोल गाढे,पोकों/कैलास शिरसाठ तसेच मोबाईल सेलचे पोकॉ/प्रशांत राठोड आदिंच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page