उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमधील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा;रुग्णालयातील रिक्तपदे त्वरित भरून नागरिकांची हेळसांड थांबवावी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नळदूर्ग प्रतिनिधी(अजित चव्हाण):-नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन अनेक महिने झाले आहेत.परंतु इमारतीमधील अनेक कामे संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे.यात प्रामख्याने कर्मचाऱ्यांचे क्वार्टर,रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर जवळील स्क्रब एरिया,फायर फायटींग, आवश्यक त्या ठिकाणी स्टील रेलिंग,एक्सोस फॅन, आवश्यक त्या ठिकाणी टॅक्टाईल पेवींग,रुग्णालयातील सर्कल मध्ये पेवर ब्लॉक,सिटिंग बेंच,रेन वॉटर हर्वेस्टिंग,प्लींथ,लिफ्टचे काम हे अपूर्ण आहेत.ही कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे,त्याच बरोबर येथील रिक्त पदे तात्काळ भरुन रुग्णांची हेळ सांड थांबवावी अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी व जिल्हाशल्यचिकित्सक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यामध्ये प्रामुख्याने भुल तज्ञ,दंतरोग तज्ञ,एक्स- रे टेक्निशियन,रेडीयोलोजिस्ट (सोनोग्राफी) आदी पदांची तात्काळ भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मनसेने दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.