अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ फेब्रुवारी):-दैनिक सार्वमतचे क्राईम रिपोर्टर सचिन दसपुते यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन करत मे ईलाबाद से बात कर रहा हू आप स्वामी प्रसाद मौर्य के बारे मे लिखना बंद करो नही तो आपका मर्डर कर दुंगा नही तो दुसरे मर्डर मे आपको फसा दुंगा असा फोन करत पाच लाखाची खंडणी मागितली असून सचिन दसपुते यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे यांनी आरोपीच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक रवाना केले असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे यांनी सांगितले.
