संगमनेर प्रतिनिधी(दि.७ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणाऱ्या देवगड खंडोबा यात्रा महोत्सवा निमित्त तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांना राज्यस्तरीय लोककलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.देवगड खंडोबा यात्रा महोत्सवा निमित्त सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हजेरीच्या कार्यक्रमा दरम्यान कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या वतीने तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांना राज्यस्तरीय लोककलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) चे प्रदेश उपाध्यक्ष तथा कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे अध्यक्ष श्रीकांत ताबाजी भालेराव यांच्या हास्ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांना राज्यस्तरीय लोककलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व जेष्ठ तमाशा कलावंत स्व.विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या त्या ’कन्या आहेत.वयाच्या सातव्या वर्षी तमाशा क्षेत्रात पाऊल ठेवले.मंगलाताईनी उडत्या चालींच्या गाण्यासह बैठकीच्या आणि खड्या भावमधुर लावण्यांनी मंगलाताई यांनी महाराष्ट्रातील जत्रा,यात्रा,उत्सवा निमित्त भक्त प्रल्हाद,येथे नांदते मराठेशाही,जिंकून आली शिवसेना,विष्णू बाळा पाटील,बापू बिरू वाटेगावकर,कारगिलच्या युध्द ज्वाला,जन्मठेप कुंकवाची,गाव तंटामुक्त झाला पाहिजे आदी पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावरील वगनाट्ये महाराष्ट्रभर गाजवली.तमाशा क्षेत्रात लोक कला जिवंत ठेवण्याचे कार्य मंगला बनसोडे यांनी केले आहे.त्यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगांवकर जन्मगावी त्यांच्या स्मरणार्थ कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहु विचारमंचाच्या वतीने मंगला बनसोडे यांना राज्यस्तरीय लोककलावंत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.प्रसंगी बाळासाहेब गायकवाड केंद्रीय कार्यकारणी सदस्य आर.पी.आय,सुभाष गडाख सरपंच हिवरगाव पावसा,पोलिस पाटील मथाजी पावसे,संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव, बाळासाहेबांची शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव,देवगड खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव,यादवराव पावसे,बाळासाहेब गडाख, वि.वि.का.सेवा सोसायटी संचालक अशोक भालेराव,पी.आय.नारायण पावसे,यात्रा कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र गडाख उपाध्यक्ष गणेश पावसे,गणेश दवंगे,चंदू भालेराव,विशाल भालेराव,सागर पलघडमल,विकास दारोळे व ग्रामस्थांसह मोठ्या प्रमाणात कला प्रेमी नागरीक उपस्थीत होते.
