धनगर समाज सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याचे आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ फेब्रुवारी):-धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी गंगा लॉन्स पाईपलाईन रोड अहमदनगर येथे राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन केले असून मेळाव्या निमित्त समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर वैचारिक मार्गदर्शन करणार आहेत . विवाह इच्छूक वधू वरांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक पी .आर .शिंदे,अध्यक्ष राजेंद्र तागड,वसंतराव दातीर , विजय शिपणकर,राजेंद्र पाचे, ज्ञानेश्वर घोडके,सूर्यकांत तागड,जाडकर साहेब, विठ्ठलराव दातीर,ज्ञानेश्वर भिसे,मोहनराव राशिनकर सर,पत्रकार निशांत दातीर,प्रा.सोपानराव राहींज , शरद धलपे सर यांनी केले आहे .