तब्बल एक लाख रुपयांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील वेगवेगळ्या तीन ठिकाणी महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्रेत्या विरुध्द कारवाई करुन 1,03,086/- रु.किंचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/शंकर चौधरी,संतोष लोढे,संदीप चव्हाण,राहुल सोळुंके,पोकॉ/कमलेश पाथरुट अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.स्थानिक गुन्हे शाखेतील पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खर्डा रोडचे कडेला इसम नामे फजल कुरेशी हा त्याचे जनता गोळी सेंटरमध्ये तसेच खर्डा चौकातील दुसरा इसम नामे फारुख सय्यद हा स्टार गोळी सेंटरमध्ये गुटखा,पानमसाला, सुगंधी तंबाखु व सुपारी बेकायदेशिरपणे विक्री करण्यासाठी ठेवलेले आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी पथकास नमुद माहिती कळवुन अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी,अहमदनगर तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंच यांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथकाने अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी, अहमदनगर तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंच यांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जनता गोळी सेंटर जवळ जावुन खात्री केली असता एक इसम गुटखा विक्री करताना दिसला पथकाची खात्री होताच जनता गोळी सेंटरवर छापा टाकुन तेथील इसमास ताब्यात घेतले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)फजल उमर कुरेशी, वय 22,रा.खर्डा चौक,ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.तो उभा असलेल्या जनता गोळी सेंटरची झडती घेता 6,600/- रुपये किंमतीचा हिरा पानमसाला, 3840/- रुपये किंमतीचा राजनिवास सुगंधित पानमसाला व 1,330/- रुपये किंमतीचा गोवा गुटखा असा एकुण 11,770/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.दरम्यान जवळच असलेल्या खर्डा चौकातील स्टार गोळी सेंटर जवळ जावुन खात्री केली असता एक इसम गुटखा विक्री करताना दिसला पथकाची खात्री होताच स्टार गोळी सेंटरवर छापा टाकुन तेथील इसमास ताब्यात घेतले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)फारुख मैनोद्दीन सय्यद, वय 28,रा.गोरोबा टॉकीज मागे,ता.जामखेड असे असल्याचे सांगितले.तो उभा असलेल्या स्टार गोळी सेंटरची झडती घेता 3,168/- रुपये किंमतीचा हिरा गुटखा, 3,840/- रुपये किंमतीचा प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला व 2,178/- रुपये किंमतीचा विमल पान मसाला असा एकुण 9,954/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांकडे नमुद मुद्देमालाबाबत चौकशी करता सुरुवातीला ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा इसम नामे विनोद तोंडे,रा.शिक्षक कॉलनी,ता.जामखेड याचेकडुन घेतला असले बाबत सांगितले.त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो घराचे आडोशाला असलेल्या पत्र्याचे शेड जवळ उभा असलेला दिसला. पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. इसम नामे विनोद तोंडे उभा असलेल्या पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता त्यामध्ये 38,160/- रुपये किंमतीचा हिरा गुटखा व 43,200/- रुपये किंमतीचा प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला असा एकुण 81,360/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.छापा घातलेल्या तिनही ठिकाणांवरुन दोन आरोपींना ताब्यात घेवुन 1,03,084/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्रीस व तयार करणेस बंदी असलेला विविध प्रकारचा पान मसाला,गुटखा, मावा,सुंगधी तंबाखु व सुपारी अवैध रित्या कब्जात बाळगतांना व विक्री करताना मिळुन आल्याने सर्व आरोपींना ताब्यात घेवुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 43/2023 भादविक 328, 272, 273, 138 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील कारवाई जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,अहमदनगर,श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.