राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे यश
अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ फेब्रुवारी):-नुकत्याच ठाणे येथे झालेल्या ८ व्या राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अत्यंत चुरशीची लढत देत राजस्थान,गुजरात, तमिलनाडु,तेलंगाना या राज्या सोबत झुंज देत सांघिक प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला तसेच व्यक्तीक प्रकारात अभिराज सानप [अडथळा] या प्रकारात तृतीय,कार्तिक मिश्रा व आदर्श बिस्वास यांनी १ मिनट स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले,महाराष्ट संघात नगरच्या ९ खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत संघासाठी सिंहाचा वाटा उचलला असे प्रतिपादन महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री.पागवड सर व सचिव सुनील सर यांनी खेळाडूंना उद्देशून केले.
या संघात नगरचे खेळाडू
*वरिष्ट गट*
१)कार्तिक मिश्रा
२)अभिराज सानप
३)आदित्य रसकोंडा
१४ वर्षा खालील मुलांमधे
१)आदर्श बिस्वास
२)मोहम्मद हकीमजीवाला
३)अर्नव अंदे
४)आदर्श मुथा
५)मोहित बकाले
या यशाबद्दल भाजपा युवा नेते श्री.सुरेंद्र गांधी यांनी कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या.खेळाडूंना प्रशिक्षक व कोषाध्यक्ष श्री.अमोल ठोंबे व सचिव प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री.सचिन गायकवाड यांनी अभिनंदन केले.