माता रमाई जयंती निमित्त रावण ग्रुप सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण
आष्टी प्रतिनीधी(गोरख निकाळजे):- दि.७ फेब्रुवारी रोजी कडा कारखाना या ठिकाणी त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.माता रमाई जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रावण ग्रुप सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात सुहास पगारे रावण ग्रुप सोशल फाउंडेशन अध्यक्ष,ओम लष्कर,रुषिकेश कांबळे,शंकर काकडे,मोहीत कांबळे,करण काकडे,विजय शिंदे,प्रतिक पवार,अभिषेक जाधव,रोहित शिरोळे,सौरभ निकाळजे, विरेंद्र निकाळजे, उपस्थित होते.रावण ग्रुप सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून माता रमाईला मानवंदना दिली.यावेळी भिमराव ससाणे, सुनिल साळवे,गोरख निकाळजे,अनिल साळवे, योगेश काळे,पोपट यादव सुनिल काळे,साईनाथ कांबळे,सरपंच पोपट गोंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.