Maharashtra247

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नावाची अंमलबजावणी करण्यासाठी नामांतर कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून नामांतर रथयात्रेला चौंडी पासून होणार सुरुवात

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ फेब्रुवारी):-पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने नगर जिल्ह्याला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगरची अंमलबजावणी करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता चोंडी या ठिकाणाहून नामांतर रथयात्रेचे उद्घाटन श्री परमपूज्य खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडी जि.कोल्हापूर येथील मुख्य मानकरी व भाकणूककार यांच्या शुभहस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.नामांतर रथयात्रा ९ फेब्रुवारी २०२३ चोंडी येथून कर्जत, श्रीगोंदा,पारनेर, संगमनेर, कोपरगाव,श्रीरामपूर,राहुरी, नेवासा,शेवगाव,पाथर्डी,नगर शहर ते नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर २० फेब्रुवारी २०२३ रोजी महामोर्चाने सांगता होईल.नगर जिल्ह्याला पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, माजीमंत्री आमदार राम शिंदे,माजीमंत्री महादेव जानकर यांनी केली विधानसभेमध्ये या मागणीला उत्तर देताना राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार हे नाव देण्यासाठी अनुकूल आहे असे उत्तर दिले.तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली व सभागृहामध्ये हा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका,पोस्ट विभाग,यांना पत्र पाठवून स्थानिक पातळीवरून सहमती दर्शक ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.परंतु याच कालावधीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नामांतरापेक्षा विभाजन व विकास महत्त्वाचा आहे.हा मुद्दा पुढे करून नामांतराच्या विषयाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तसेच नामांतराची मागणी आणि स्थानिक जनतेकडून मागणी नाही अशी चर्चा सुरू केली.त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जाऊन पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून ही मागणी लोकाभिमुख करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.व जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठराव.खासदार,आमदार,नगराध्यक्ष, नगरसेवक,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे नामांतराला पाठिंब्याचे पत्र घेतले जाणार आहे.पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अखंड भारतातील कार्य माहितीपटाच्या माध्यमातून दाखविले जाणार आहे.तरी या नामांतर रथयात्रेसाठी सर्व अहिल्या प्रेमींनी उपस्थित राहावे.असे आवाहन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या विजय तमनर,सचिन डफळ,काका शेळके,निशांत दातीर,राजेंद्र तागड,अक्षय भांड,विठ्ठल दातीर,सुनील भांड,अरुण मतकर,आदींनी केले आहे.

You cannot copy content of this page