अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ फेब्रुवारी):-एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे सचिन कडुबाळ दसपुते रा.गोपाळपुर ता.नेवासा जि.अहमदनगर दैनिक सार्वमत पेपरचे रिपोर्टर यांना दि. 6/2/2023 रोजी 3.58 त्यांच्या या 9860543326 मोबाईल नंबर वर अज्ञात इसमाने त्याचा मोनं 8127040695 यावरुन फोन करुन फिर्यादीस पाच लाख रुपयाची खंडणी मागीतली व व सदर खंडणीचे पाच लाख रुपये न दिल्यास तुमचा मर्डर करु तसेच इलाहाबाद,प्रयागराज या ठिकाणी मर्डर करुन त्यामध्ये तुमचे नाव टाकुन तुम्हाला त्या मर्डरच्या केसमध्ये अडकवुन टाकु अशी धमकी दिली वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं 110/2023 भादवि कलम 384,506 प्रमाणे दाखल करण्यात आला होता,सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेशान्वये एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोसई/ चाहेर,पोना/साबीर शेख,पोकॉ/जयसिंग शिंदे हे तात्काळ औरंगाबाद येथे रवाना होवुन त्याचे राहते घराची माहीती काढुन मौजे लासुर स्टेशन ता.गंगापुर जि.औरंगाबाद येथुन इसम नामे शिवमकुमार संतोषकुमार पांण्डे वय 22 वर्षे (रा.फुलपुर इलाहाबाद,उत्तरप्रदेश हल्ली रा.लासुर ता.गंगापुर जि.औरंगाबाद) यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई श्री/चाहेर एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील नगर ग्रामीण विभाग,पोलीस निरीक्षक अनिल कटके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/युवराज आठरे,पोसई/चाहेर,पोना/साबीर शेख,पोकॉ/जयसिंग शिंदे अहमदनगर मोबाईल सेलचे पोना/रवि सोनटक्के व प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.
