शेवगाव प्रतिनिधी (अविनाश देशमुख):-शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील जिल्हापरिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेवरील शिक्षकेचा गेल्या महिन्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या बदलीचा आदेश आज जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून निघाला असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील उर्दू शाळेवरील मयत शिक्षिका शेख अफसाना शबीर (रा. झेंडीगेट,)नगर यांचे १२ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.निधन होऊन दीड महिना उलटल्या नंतरही आज दि.6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बदलीचे आदेश शेवगाव इथून जामखेड येथे निघाले.याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.या बदलीच्या आदेशामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाचा ढिसाळपना पुन्हा एकदा समोर आला आहे. सोबतच्या यादीतील अनुक्रमांक 26 मध्ये नाव आले यामुळे शिक्षक व जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले. मृत्यूनंतरही दीड महिन्याने बदलीचे आदेश निघाल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.