अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ फेब्रुवारी):-दि.०७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी नामे कृष्णा सुधाकर ठोंबरे (वय.३० वर्ष, धंदा-शिक्षण रा.खंड ता.पाटोदा जि.बीड) हे व त्यांचा मित्र पोलीस भरती साठी मैदानी चाचणी करीता पुणे येथे जाण्याकरीता त्यांचे गावातून टूकने बसुन चांदणीचौक,अहमदनगर येथे रात्री ०१.०० वा सुमारास उत्तरले व तेथे उतरुन पायी माळीवाडा बसस्टँडवर जात असताना खालकर हॉस्पिटलसमोर ब्रीज खाली रोडवर आले असता तेथे फिर्यादी व त्यांच्या मित्रा समोर विरुद्ध साईडने टिव्हीएस कंपनीच्या मोटर सायकलवर दोन अनोळखी इसम समोर येवून सदरचे दोन्ही इसम गाडीवरुन उतरुन त्यापैकी एकाने त्याचे कमरेला लावलेली पिस्टल काढून दाखवून तुम्ही चुपचाप तुमच्याकडे असलेले पैसे काढून दया नाहीतर तुम्हाला गोळी घालीन अशी धमकी देवून त्यानी फिर्यादी त्याचे मित्राच खिशातील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतले व चांदणी चौकाच्या दिशेने जोरात निघून गेले. वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं १२६/२०२३ भादवि कलम ३९२.३४९,३४ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा दाखाल होताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांना सदर दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले सदर आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,टिव्हीएस स्टार सोटी मोटारसायकल नंबर एम. एच. १६. झेड ३५५३ या मोटरसायकलवर रात्री परवेज सम्यद व सोहेल शेख है फिरत होते.व ते दौड रोडने अहमदनगर शहराच्या दिशेने टिकीएस स्टार सीटी मोटरसायकल वरून येत आहेत सदरची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक/ मनोज कचरे यांनी कायनेटिक चौक येथे सापळा लावला असता सदरची मोटारसायकल व त्यावर दोन इसम येत असल्याचे दिसले तेव्हा आम्ही त्यांना पोलिसांनी इशारा दाखवून थांबण्याचा इशारा केला परंतु सदर मोटरसायकल वरील इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यांना जागीच शिताफीने ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ देशी बनावटीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व यात गेलेला माल १२००/- रोख रक्कम मिळून आले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता १) परवेज मेहबूब सय्यद वय २२ वर्षे रा.भोसले आखाडा अहमदनगर २) सोहेल शफीक शेख वय १८ वर्षे रा.भांबळ गल्ली भोसले आखाडा,अहमदनगर असे सांगून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे कबुली दिली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक/मनोज कचरे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/संपतराव शिंदे,गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक/मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन,गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,ए.पी.इनामदार,सुजय हिवाळे,सोमनाथ राऊत,संदीप थोरात,अमोल गाढे,कैलास शिरसाठ यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
